एकनाथ शिंदे मैदानात.. सुरू होणार ठाकरे-शिंदे वादाचा नवा अंक ? ; जाणून घ्या..

एकनाथ शिंदे मैदानात.. सुरू होणार ठाकरे-शिंदे वादाचा नवा अंक ? ; जाणून घ्या..

Eknath shinde : निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना (Shivsena) पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे.आता एकनाथ शिंदे हे शिवसेना अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे आता शिवसेना भावनावर दावा करतात का ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यावेळी पार्टी कार्यालय ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटात तुंबळ युद्ध झाल्याचे दिसले. ठाणे, कल्याण, नवी मुंबई , पनवेल या भागात तर बरेच कार्यालय शिंदे गटाने ताब्यात देखील घेतले होते. त्याच वेळी विधानभवनातील पक्ष कार्यालय आणि मुंबई (Mumbai) महापालिका मधील कार्यालयाचा वाद चव्हाट्यावर आला.अखेर ही दोन्ही कार्यालय सील करण्यात आले.

हा वाद शमतो ना शमतो तोच शिंदे गट शिवसेना भावनावर दावा सांगणार का याविषयी चर्चा रंगली आहे. शिंदे गटाने दादरमध्ये पक्षाचे मुख्य कार्यालय करण्याचा निर्णय घेतला. दादर कार्यालय म्हणजेच शिवसेना भवन ताब्यात घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्ष आल्यानंतर पक्ष कार्यालय कोणाचे हा देखील वाद नक्की उफाळून येणार असे दिसते आहे. त्यामध्ये शिवसेना भवन कोणाचे या कडेही लक्ष लागले आहे.

हे वाचा : उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा आणखी एक झटका.. कसबा-चिंचवड निवडणुकीपुरतीच राहणार मशाल !

पण शिवसेना भवन हे पक्ष कार्यालय जरी असले तरी ती जागा पक्षाच्या नावावर नाही. शिवसेना स्थापन झाली त्यावेळी शिवाई या ट्रस्टच्या नावे ही जागा आहे. ती १९७९ ला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ट्रस्ट तसेच ठेवून आता काही नाव बदलण्यात आली असल्याची माहिती मिळाली.या ठिकाणी शिवसेना भवन सुरु झाले. बरीच वर्ष या इमारतीत सेना भवनाचे काम सुरू होते.

सन २००५ मध्ये या ठिकाणी शिवसेना भवन आताच्या नवीन वास्तू बांधण्यात आली त्यानंतर शिवसेनेचा कारभार या ठिकाणी आहे.त्याच प्रमाणे सामना हे वृत्तपत्र जरी शिवसेनेचे मुखपत्र असले तरी ते प्रबोधनकार या पब्लिकेशनचा भाग आहे.त्यामुळे या दोघांवर दावा शिंदे याना करता येणार नाही. पण राज्यामध्ये असलेल्या ठिकठिकाणच्या शाखा वरून दोन्ही गटात आगामी काळात नक्कीच संघर्ष पहायला मिळू शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube