‘शरद पवारांची साथ का सोडावी लागली?’ धनंजय मुंडेंनी खरं काय सांगूनच टाकलं

‘शरद पवारांची साथ का सोडावी लागली?’ धनंजय मुंडेंनी खरं काय सांगूनच टाकलं

Dhananjay Munde on NCP Crisis : राज्याच्या राजकारणात 2 जुलै हा दिवस अविस्मरणीय राहिल. कारण या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकवत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश होता.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच शब्द चालत होता. ही आघाडी अभेद्य राहून एकत्रितच निवडणुकांना सामोरे जाईल अशी प्रत्येकाचीच धारणा झालेली असतानाच अचानक हा भूकंप झाला. तसे पाहिले तर सारेकाही आधीच ठरले होते. मात्र जनतेच्या दृष्टीने ही घटना अनपेक्षित अशीच होती. असं नेमकं घडलं तरी काय की ज्यामुळे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं, राष्ट्रवादीच्या आमदारांना शरद पवार यांची साथ का सोडावी लागली असे प्रश्न आजही लोकांच्या मनात घोळत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई तकच्या चावडी कार्यक्रमात दिली.

‘कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार’, बावनकुळेंकडून नव्या इनकमिंगचे संकेत

शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली, ईडी सीबीआयच्या नोटीसांमुळे भाजपबरोबर गेलात का असे प्रश्न मुंडेंना विचारण्यात आले. त्यावर मुंडे म्हणाले, शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका आहे. याआधी 5 जुलै रोजी जो मेळावा झाला होता त्यात अजितदादांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहेच.

ईडी, आयकर विभागाच्या नोटीसा अनेक दिवसांपासून येत आहेत. मात्र, या नोटीसांच्या भीतीने आम्ही भाजपबरोबर गेलो असा समज पसरविण्यात आला. पक्षाचे सर्वच नेते त्याठिकाणी होते. त्यांनीच हा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्यासारखा दुसरा, तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता काय वेगळा विचार करत नव्हता. आम्ही सर्वांनीच सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडलेली नाही.

LetsUpp Special : पवार पुन्हा भिजणार की ठाकरे डरकाळी फोडणार ?

पवार साहेबच आमचं दैवत आहेत, आमचे आधारस्तंभही तेच आहेत. पण, पक्ष म्हणून घेतलेली भूमिका हा महायुतीचा भाग होता. सर्व आमदारांची कामे होणे, मतदारसंघात विकास होणे, आमदार म्बणून जबाबदारी आहेच ना, असे मुंडे म्हणाले.

तुम्ही देवाला देव्हाऱ्यातून बाहेर काढलं आणि देव्हाऱ्यावर म्हणजेच पक्ष आणि चिन्हावर दावा केला असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर देव देव्हाऱ्यात आणि मनात आहे. देव्हाऱ्यात जाऊन पूजा करू नका, हे देवानं सांगितलं तरी भक्त देवाचं मंदिर मनात करून पूजा करत असतो असे उत्तर त्यांनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube