संतोषची पत्नी कुटुंबाच्या दबावामुळं निवडणूक लढवते; विरोधी उमेदवाराच्या आरोपाने खळबळ

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघालं आहे.

News Photo   2026 04 22T145209.265

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Beed) यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडू लागल्या आहेत.

या निवडणुकीत समोरासमोर उभे असलेले उमेदवार अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यातील संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे. विरोधी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना ही निवडणूक मुळात लढवायचीच नव्हती. मात्र, कुटुंबीयांच्या दबावामुळे त्यांना रिंगणात उतरावं लागलं. या विधानामुळं निवडणुकीला नवं वळण मिळालं आहे.

बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांचं सर्वेक्षण; किती आहेत एकूण कामगार? 

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात आधीच तणावाचं वातावरण असताना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघालं आहे. खरं कोण आणि खोटे कोण? याबाबत गावात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देणार आहे. तसंच त्यांनी पाहिलेली गाव विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे.

संतोष यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा पुढं करत मतदारांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मी स्वतःच्या इच्छेने निवडणूक लढवत आहे, असं त्यांनी स्पष्ट करून उमेदवारीमागे धनंजय देशमुख यांनी दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितलं .

follow us