शिंदे-फडणवीस सरकारचं मोठ गिफ्ट; शेतकऱ्यांना मिळणार 12 हजारांचं अनुदान अन् युवकांना देणार रोजगार

शिंदे-फडणवीस सरकारचं मोठ गिफ्ट; शेतकऱ्यांना मिळणार 12 हजारांचं अनुदान अन् युवकांना देणार रोजगार

NAMO Shetkari Yojana: राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला 6 हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे एकुण बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Cabinet Meeting : शेतकऱ्यांना मिळणार केवळ एक रूपयात विमा; शिंदे-फडणवीसांनी दिली मंजुरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देतात त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील सहा हजार रुपये देणार आहे. त्या योजनेला आज मान्यता मिळाली आहे. जवळपास 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ज्यावेळी केंद्र सरकारचा हप्ता जमा होईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान या बैठकीमध्ये इतर अनेक विभागासाठी देखील निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यात आली. यामुळे 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे. महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube