गांधी टोपी, धोतर अन् सदरा; जपानमध्ये झिरवळांचा मराठमोळा अंदाज

गांधी टोपी, धोतर अन् सदरा; जपानमध्ये झिरवळांचा मराठमोळा अंदाज

Narahari Zirwal :  राज्यातील काही आमदार काल अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या दौऱ्यात झिरवळ हे आपल्या खास पोशाखामुळे चर्चेत आले आहेत.

सर्वसाधारणपणे आपल्याकडचे कोणी परदेश दौऱ्यावर गेले असता सूट परिधाण करतात किंवा त्या देशातील पोशाख परिधाण करतात. पण झिरवळ मात्र आपल्या खास मराठमोळ्या पोशाखातच जपानमध्ये वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते आहे. सर्वांना त्यांचा हा लूक आवडलेला दिसतो आहे. नरहरी झिरवळ हे सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या साधेपणासाठी ते जाणले जातात. याचमुळे परदेशात जातानाही झिरवळ यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांचा हाच साधेपणा या फोटोतून दिसतो आहे.

या फोटोमध्ये नरहरी झिरवळ हे गांधी टोपी, धोतर, सदरा व त्यावर जॅकेट अशा मराठमोळ्या पोशाखामध्ये ते दिसत आहेत. त्यामुळे परदेशात जाऊन देखील झिरवळांनी आपलाच पोशाख कायम ठेवल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो आहे. यावेळी त्यांच्यासोबत फोटोमध्ये विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार श्वेता महाले, आमदार मनीषा कायंदे आदी लोक दिसत आहेत.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जपानला रवाना होताना देखील नरहरी झिरवळ यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. या फोटोत स्वतः नरहरी झिरवळ हे त्यांच्या नेहमीच्या सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावात होते. तर त्यांच्या पत्नीने हिरव्या रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. त्यामुळे आपली पारंपारिक ओळख घेऊनच हे पती-पत्नी दोघेही परदेशात गेल्याचे दिसून आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube