भाकरी कसली फिरवताय, .. त्याला वेळ, काळ… वय असतं राणेंचा पवारांवर निशाणा
narayn rane on shrad pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील बदलासाठी काही दिवसापूर्वी आता भाकरी फिरवायांशी वेळ आली असे वक्त्यव्य केलं होत. यांच्या या वक्तवयावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. आता कसली भाकरी फिरवताय .. त्याला वेळ, काळ… वय असतं आता तुमचे वय निघून गेले आहे. अशा शब्दात राणेंनी पवारांवर टीका केली. ते आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बिळात होते.
पुढे बोलताना राणे म्हणतात आता भाकरी करपली आहे. टी बदलण्याची वेळ आली होती. म्हणून आम्ही राज्यात सत्ता परिवर्तन करून शिंदे – फडणवीस यांचे सरकार आणले. आता तुमच्यात भाकरी बदलण्याची ताकद राहिलेली नाही तुम्ही तो विषय सोडून द्या असे म्हणत राणेंनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्याची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा, ‘आग्र्यात आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणार’
पुढे बारसू प्रकल्पावरून राणेंनी विरोधावर बोलताना म्हंटले ‘कोण विरोधक.. काय त्यांचं कोकणात योगदान? किती प्रकल्प त्यांनी कोकणात आणले. विमानतळ, धरणं, रेल्वे… सगळ्याला यांचा विरोध.. आता सव्वा ते दीड लाख कोटीचा प्रकल्प येतोय त्याला विरोध.. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतायेत. लोकांना रोजगार मिळण्यासाठी काय केलं उद्धव ठाकरे.. चिवसेना.. चिवसेनेने..’ असं म्हणत नारायण राणेंनी यावेळी पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.