शिंदेंना कुमारस्वामी अन् चिराग भारी; 5 आणि 2 खासदार असतानाही मिळालं कॅबिनेट मंत्रिपद
Modi new cabinet : नरेंद्र यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला. त्यांनी काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपला यावेळी एनडीए म्हणून बहुमत मिळालेलं असलं तरी भाजपला स्वबळावर बहुमत प्राप्त झालेलं नाही. (Modi Cabine) त्यामुळे तिसरा कार्यकाळ सुरू झाला असला तरी त्यामध्ये सहयोगी पक्षांच्या भरोशावर हे सराकर आता चालणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही वाटा असून एकनाथ शिंदे यांचे यामध्ये 7 खासदार आहेत. (Modi) त्यामुळे त्यांना किमान दोन मंत्रीपद मिळतील असंल बोललं जात होत. मात्र, प्रत्यक्षात तस झालेलं नाही.
एकही खासदार नसताना राज्यमंत्रीपद नरेंद्र मोदींचं तिसरं मंत्रिमंडळ; भाजपाचाच वरचष्मा, वाचा A टू Z मंत्री अन् त्यांची खाती
मोदी सरकारच्या या तिसऱ्या कार्यकाळात सहयोगी पक्षांमध्ये मुत्सदेगिरी (बार्गेनिंग) करण्यात कर्नाटकचे एच.डी.कुमारस्वामी, लोजपाचे चिराग पासवान आणि रिपाइंचे रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा जड ठरले आहेत. कारण, 7 खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 1 मंत्रिपद देण्यात आलंय. ते मंत्रिपदही केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हे देण्यात आहे. तर, दुसरीकडं बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांच्याकडं 5 खासदार असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय. तसंच, रिपाइंच्या रामदास आठवले यांच्याकडे लोकसभेतून निवडून आलेला एकही खासदार नसताना त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
एच. डी. कुमारस्वामींना कॅबिनेट
कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनात दल सेक्युलर पक्षाला 2 खासदार असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले, तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी शपथ देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 6 खासदार मंत्री
- नितीन गडकरी – कॅबिनेट
- पियुष गोयल – कॅबिनेट
- प्रतापराव जाधव – राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
- रामदास आठवले – राज्यमंत्री
- रक्षा खडसे – राज्यमंत्री
- मुरलीधर मोहोळ – राज्यमंत्री