ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

मुंबई : नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर शुभांगी पाटील या देखील निवडणुकीत उभ्या राहिल्या.

पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून, आता त्याच नॉट रिचेबल आहेत. एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत.

शुभांगी पाटील या अर्ज मागे घेणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय ट्विस्ट अँड टर्न येणार हे येत्या काळात अधिक स्पष्ट होत जाणार आहे.

ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर शुभांगी पाटील नाशिकल्या परतल्या. मात्र, नाशिकला गेल्यानंतर त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही आहे.

मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अशात शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. पाटील या अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही वेळ उरला असुन अशात शुभांगी पाटील समोर येणार का? हा प्रश्न विचारला जातो आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube