मोठी बातमी; नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार
Navi Mumbai Municipal Corporation Election : महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढवणार असल्याची घोषणा
Navi Mumbai Municipal Corporation Election : महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढवणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळाल्याने पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर आता नवी मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Navi Mumbai Municipal Corporation Election) शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) युतीचा फॉर्मुला जुळाल नसल्याने दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगणार आहे. भाजप आणि शिवसेनेत युतीचा फॉर्मुला जुळला नसल्याने दोन्ही पक्षांकडून आता एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आले आहे.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि पुण्यात (Pune) देखील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन मतभेत निर्माण झाल्याने दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. भाजपकडून सम्मानजनक जागा देण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवणूक लढवणार असं शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.
संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या. स्थानिक कार्यकर्ते एक वेगळ्या भूमीकेत पाह्यला मिळाले. शंका अगोदर आली होती. मी दरवेळेस स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या. बावनकुळे यांच्या बरोबर देखील बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांच्या समोर जागा वाटप ठरले. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची भूमिका होती असा आरोप राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी केला आहे.
मोठी बातमी; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी-
नवी मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
