दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला

दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला

Sunil Tatkare On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन अजित पवार गटाकडून पुण्यात साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यात बोलताना पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला . या कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांना देखील नाव न घेता टोला लावला.

या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, दादा आज कोणीतरी म्हणाले की, तुम्ही आज जॅकेट घालून आले आहे. तुम्ही जॅकेटमधील वाघ आहे. कोण म्हणत असेल जॅकेट पांघरलं पण वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे तो वाघ होत नाही. कोणी तरी तुमच्याशी तुलना करण्याचा केवीलपणा करत असतो. असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांना टोला लावला.

पुढे बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले त्यामुळे पुन्हा कार्यकर्ता उभा राहिल की नाही हा प्रश्न होता. नेतृत्व पूर्णपणे अपयशी झाले, राज्यात सर्वात अपयशी नेतृत्व म्हणून अजित पवारांची गणना करण्यात येत होती मात्र विधानसभा निवडणुकीत आपण अजितदादा यांच्या नेतृत्वात 41 जागा जिंकल्या असं या कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले. तसेच विदर्भ, अहिल्यानगरमध्ये पक्षाने शानदार कामगिरी केली. असेही यावेळी सुनील तटकरे म्हणाले.

रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ मधील दुसरं गाणं ‘बर्बाद’ प्रदर्शित; सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स 

 पण दादा दादा आहे : सुनील तटकरे 

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात यश मिळाला नाही त्यानंतर संपूर्ण देशात वेगवेगळी भाकीत केली गेली पण दादा दादा आहे. कोणाला तरी दादांची आठवण दररोज येत असते मात्र त्यांची आठवण दररोज का? येते हे मला माहिती नाही, असं यावेळी सुनील तटकरे म्हणाले.

तर हसन मुश्रीफ यांना देखील पराभव करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्यात आले होते मात्र मुश्रीफ म्हणजे मुश्रीफ आहे. ज्याचा नाव हसन तो सर्वांचा करतो कल्याण. पुन्हा एकदा मुश्रीफ मोठ्या फरकाने विजयी झाले असं या कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube