मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंकडून सर्व पदांचा राजीनामा; विधान परिषद न मिळाल्याने नाराजीच्या चर्चा
NCP Anand Paranjape resigns राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंकडून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
NCP chief spokesperson Anand Paranjape resigns from all posts Talk of displeasure over not getting Legislative Council seat : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंकडून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने नाराजीच्या चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षामध्ये जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.