Ajit Pawar : समीर वानखेडेंना प्रामाणिक अन् मलिकांना खोट ठरण्याचा प्रयत्न
NCP leader Ajit Pawar criticizes Sameer Wankhede over Aryan Khan drug case : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी समीर वानखेडे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचाही उल्लेख केला.
मलिक यांनी वानखेडेंच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतल्यावर अनेकांनी त्यांना लबाड ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वानखेडेंवर झालेल्या त्याच आरोपांची आज सीबीआयकडून चौकशी होतेय, असं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाने आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. मात्र, या प्रकरणाशी संबंधित पुरावे प्रसारमाध्यमांसोबत शेअर करू नका, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ३ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे CBI ला निर्देश दिले असून 8 जून रोजी सुनावणी होणार आहे.
Raavrambha: रायगडावर छत्रपतींचा आशीर्वाद घेत रावरंभांच्या टिमने दिमाखात केलं पोस्टर लाँच..
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानकडून काही रक्कम मागितल्याचा आरोप आहे. याचा उल्लेख खुद्द सीबीआयनेच केला आहे. मात्र, याआधी आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांनी वारंवार माध्यमांना याबाबतची माहीती दिली. माध्यमांनीही ते सगळं दाखवल. पण नंतर नवाब मलिक यांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला, ते मुद्दाम आरोप करत आहेत आणि अधिकारीपदावरील समीर वानखेडे हे अतिशय प्रामाणिक, स्वच्छ आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचाली आणि वक्तव्ये पाहता मविआत अंतर्गत धुसफुस असून आघाडीत बिघाडी निर्माण होणार असं बोललं जातं आहे. दरम्यान, यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. महाविकास आघाडी ही कायम एकजूटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता जो काही निर्णय होईल तो या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील असेही अजित पवार यांनी सांगितले.