चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय कसं सुरू झालं; धानोरकरांची दिलदारी सांगताना अजितदादाही गहिवरले

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय कसं सुरू झालं; धानोरकरांची दिलदारी सांगताना अजितदादाही गहिवरले

Ajit Pawar On Balu Dhanorkar :  काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला. यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बाळू धानोरकर यांचे निधन दुखद आहे. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. बाळू धानोरकर हे तरुण होते. धानोरकर साहबे गेले यावर अजून विश्वस बसत नाही, असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी बाळू धानोरकरांचा एक खास किस्सा सांगितला.

Balu Dhanorkar : लोक हिणवत पण… धानोरकरांच्या पत्नीने सांगितलेला ‘तो’ भावूक करणारा किस्सा

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षकार्यालय नाही, ही गोष्ट धानोरकर यांना कळाली. तेव्हा धानोरकर यांनी मला म्हटलं की, माझं स्वत:चं कार्यालय आहे. ते मी राष्ट्रवादीच्या कार्यलयासाठी देतो. त्यावर मी म्हटलं की, तुम्ही स्वतं:च कार्यालय कसं देता त्यावर धानोरकर म्हणाले की, मी पवार साहेबांना मानतो, मला राष्ट्रवादी पक्षही आपलाच वाटतो. आपल्या सगळ्यांना मिळूनच काम करायचे आहे. मित्रपक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी स्वतची जागा देण्याचा दिलदारपणा बाळू धानोरकरांकडे होता, असे अजित पवार म्हणाले.

तसेच गेल्या निवडणुकीत जागावाटप सुरु होते. तेव्हा मी बाळू धानोरकर यांना भेटलो. ते खासदार झाल्याव त्यांची व माझी ओळख झाली. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी ते मला भेटले होते. त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. त्यासाठी ते मला भेटायला आले होते.

ऑडियो क्लिप व्हायरल झाली अन् धानोकरांचं तिकीट डिक्लेअर झालं… 2019 मध्ये काय घडलं होतं?

मी त्यांना विचारलं ती, तुम्ही तयारी केलेय?, त्यावर धानोरकरांनी यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रपूरची जागा आपल्याला लढवायची आहे, तयारीला लागा, असे सांगितले होते. पण युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आली. त्यामुळे संपूर्ण तयारी करूनही मला निवडणूक लढवता येणार नाही. मला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं तिकीट द्या, मी लढायला तयार आहे’, असे धानोरकर यांनी म्हटले. त्यावेळी धानोरकर हे पवार साहेबांशीही बोलले.

नंतर पवार साहेबांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर यांना संधी देण्यात आली, असे अजित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपची लाट असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकमेव जागा निवडून आली. ती जागा बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नामुळेच निवडून आली, असे म्हणत अजितदादांना धानोरकरांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube