राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना अटक होणार? कारण…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना अटक होणार? कारण…

पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दिलेलं संरक्षण आज(सोमवारी) संपलं आहे, त्यामुळे आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Third Eye Asian Film Festival च्या प्रवेशिका सुरू; सिने रसिकांसाठी ठरणार पर्वणी

पुण्यातील भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाकडून खडसे यांना दणकाच बसल्याचं बोललं जात आहे.

Pune : मुक्तांगण शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण; मनसे कार्यकर्त्यांनी आणला प्रकार उघडकीस

एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी प्रकरणात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात खडसे यांना अटकेपासून संरक्षण दिलेलं संपलं असून या कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतरांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे पुण्यातील भोसरीमध्ये जमीन खरेदी केली. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरीतल्या एमआयडीसी परिसरात अब्बास रसुलभाई उकानी यांच्याकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली होती. या खरेदीची नोंदही नियमाप्रमाणे करण्यात आली होती. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले आहेत. या खरेदीसाठी गिरीश चौधरी यांनी काही कंपन्यांकडून आलेला पैसा देऊन जमीन खरेदी केल्याचं समोर आलं होतं. या व्यवहारात राज्य सरकारचं 61 कोटींचं महसूलाचं नूकसान झाल्यांचही समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.

World Cup 2023 : श्रीलंकेचा पराभव पण, धक्का पाकिस्तानला; आफ्रिकेने केला मोठा उलटफेर

मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथ खडसे यांना दणका दिल्यानंतर आता भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना एसीसबीकडून अटक होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता पुढील काळात खडसे यांना एसीबी अटक करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube