चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, बारामती पोटनिवडणूक; प्रदेशाध्यक्ष तटकरे काय म्हणाले?

आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या.

Chakankar Tatkare

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात, बारामती (Baramati) पोटनिवडणूक आणि सातारा जिल्हा परिषदेतील घटना यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी रुपाली चाकणकर यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षाबाबत राजीनाम्याबाबत सुनील तटकरे यांनी एका ओळीत उत्तर दिलं.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केले. आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या. त्यामुळे बारामतीमधील पोटनिवडणुकीसह रुपाली चाकणकर यांच्या विषयी सुद्धा या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाकणकरांना सेक्स रॅकेटच्या सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत रुपाली ठोंबरेंच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

बारमाती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 6 एप्रिल रोजी आमच्या नेत्या सुनेत्रा पवार या अर्ज भरणार आहेत. पूर्वी जी निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी ती निवडणूक झाली होती. सुप्रिया सुळे यांनी उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं. त्यांचे मी आभार मानतो. जर काँग्रेसने उमेदवार द्यायचा विचार केला तर मी आणि प्रफुल पटेल काँगेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांच्याशी बोलू. आमची इच्छा आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी.

काल विधानसभा, विधानपरिषदेत साताऱ्यातील घटनेवर सविस्तर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री निवेदन सभागृहात बोलतील. मकरंद आबा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आहेत. सातारा पोलीस अधीक्षक आणि पोलीस यांनी निवडणुकीच्या दिवशी जे केलं ते सर्व चॅनल वर पाहिलं. जे घडल ते चुकीचंच आहे. आम्ही NDA मधे सगळे आहोत. एका जिल्हा परिषदेत स्थानिक पातळीवर घडलेली घटना योग्य नाही. दोन नेत्यांची बैठक झाली असेल तर त्याचा अधिकृत तपशील समोर नाही. जोपर्यंत त्या दोघांचा तपशील समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणे योग्य नाही.

follow us