Neet Exam : श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरायचा अन्..,; शुभम खैरनारची ‘मोडस ऑपरेंडी’ कशी होती?

श्रीमंत विद्यार्थ्यांना डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून शुभम खैरनार पैसे उकळत असल्याचा धक्कादायक खुलासा सीबीआयच्या चौकशीत झााल आहे.

Shubham khairnar

Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये नाशिकच्या शुभम खैरनारचाही (Shubham Khairnar) समावेश आहे. हाच शुभम खैरनार महाविद्यालयातील श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरुन डॉक्टर होण्याचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी नेमकी चालायची? याबाबतचा धक्कादायक खुलासा सीबीआयच्या तपासात उघड झालायं.

Microsoft : कामगारांची झोप उडाली; पुढील 18 महिन्यांत नोकरी..,; मायक्रोसॉफ्टने दिला इशारा

अभ्यासात ढ असलेले विद्यार्थी आणि अर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले श्रीमंत विद्यार्थी हेरुन त्यांना शुभम खैरनार डॉक्टर बनवण्याचे स्वप्न दाखवायचा. ज्या ढ विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे आहे, त्याच्यासाठी हा शुभम काम करीत होता. त्यांना हेरुन डील करत असत.

श्रीमंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिकाच देतो सांगून त्यांच्याकडे 15 ते 20 लाख रुपयांची शुभम खैरनार डील करीत असत. त्यानंतर तो 10 लाख रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका घेत, आणि विद्यार्थ्यांना तो हीच प्रश्नपत्रिका 15 लाख रुपयांना विकत असत.

झोपडपट्टीत काढले दिवस; पहिल्याच प्रयत्नात बनली अधिकारी, कोण आहे उम्मुल खेर?

नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लिक होण्याचा गैरप्रकार सुरु असतानाच नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून लिक झाली, असल्याचं समोर आलंय. आता या प्रकरणात अनेक कोचिंग क्लासेसही संशयाच्या भोवऱ्यात असून अनेकजण सीबीआयच्या रडारवर आहेत.

शुभम खैरनार नेमका कोण?
शुभम खैरनार हा मूळ नांदगावचा असून नाशिकमध्ये तो बी.ए.एम.एसचे शिक्षण घेत आहे. नीट परीक्षेचा पेपर लिक होताच शुभमने आपला वेश बदलून पळ काढला होता. कोणी ओळखू नये, म्हणून शुभमने आपले संपूर्ण केस कापले असून कपडेही बदलले होते. शुभम देवदर्शनासाठी जात असतानाच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केलीयं.

दरम्यान, शुभमच्या कार्यालयात आणि घरी नेमके कोण-कोण लोक भेटायला येत होते, याचा सुगावा लावण्यासाठी सीबीआय आता त्याच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची सखोल तपासणी करत आहे. 3 मे रोजीची नीटची परीक्षा पेपर लिकच्या प्रकरणामुळे प्रशासनाकडून रद्द करण्यता आलीयं. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटच्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून 21 जून रोजी नियोजित नीटची पुर्नपरीक्षा होणार आहे.

follow us