मुलाला डॉक्टर बनवण्यासाठीच फोडला ‘नीट’चा पेपर? मोटेगावकरच्या घरात सापडली प्रश्नपत्रिका…

नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरच्या घरातच प्रश्नपत्रिका आढळून आल्याने मुलासाठी पेपर फोडला होता का? असा दाट संशय सीबीआयला आहे.

Untitle (13)

Neet Exam Paper Leak : बहुचर्चित नीट पेपर फुटी प्रकरणात (Neet Exam Paper Leak) दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला (Shivraj Motegoankar) सीबीआयने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला सीबीआय कोठडी सुनावलीयं. दोन दिवसांच्या तपासात सीबीआयला नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरविरोधात अनेक पुरावे आढळून आले आहेत. शिवराज मोटेगावकर याचा मुलगा 12 वीला होता. त्यानेही नीटची परीक्षा दिलीयं. अशातच मोटेगावकरच्या घराची झाडा-झडती घेतल्यास सीबीआयला नीटची मूळ प्रश्नपत्रिकाच हाती लागल्याचं आहे. त्यामुळे आता शिवराज मोटेगावकरने मुलाला डॉक्टर बनवण्यासाठीच ही प्रश्नपत्रिका फोडल्याचा सीबीआयला संशय आहे.

US-Iran War : इराणवर हल्ला करु नका, आखाती देशांची विनंती…डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

शिवराज मोटेगावकर यानेच स्वत:चं वजन वापरत आपल्या कोचिंग क्लासेसमधील प्राध्यपक पी.व्ही. कुलकर्णी याची नीट परीक्षा प्रश्नपत्रिकेच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर कुलकर्णी याने ही गोपनीय प्रश्नपत्रिका मोटेगावकरला पुरवल्याचा दाट संशय आहे. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असून शिवराज मोटेगावकर याला विशेष न्यायालयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीयं. या 9 दिवसांच्या चौकशीतून अनेक नवीन खुलासे बाहेर येतील, अशी शक्यता आहे.

सीबीआयने केलेल्या तपासात आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरच झोलकर निघाल्याचं निष्पन्न झालंय. आपल्या कोचिंग क्लासचे प्राध्यापक पी.व्ही कुलकर्णी याची प्रश्नपत्रिका पॅनेलवर नियुक्ती ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणे, हा संपूर्ण सुनियोजित कटच असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण कटामध्ये शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनिषा मांढरे आणि मनिषा वाघमारे हेच मुख्य सुत्रधार असल्याची माहिती समोर आलीयं. त्यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडालीयं.

वेंगुर्ल्यात प्रथमच रंगणार मराठी चित्रपट महोत्सव, २३ ते २६ मे’ला दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येणार

नीट परीक्षा फुटी प्रकरणी सीबीआयने आरसीसी कोचिंग क्लासचे प्राध्यपक पी.व्ही कुलकर्णी आणि मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरांचं नाव समोर आलं. त्यानंतर सीबीआयने सुरुवातीला मोटेगावकरची लातूरला जात साधी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. यामध्ये डिलिट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईलमधील प्रश्न आणि नीट परीक्षेतील प्रश्न अगदी तंतोतंत जुळले. त्यानंतर मोबाईल घेण्यासाठी मोटेगावकरला पुण्याला बोलवले. मोटेगावर आपल्या ड्राईव्हरसोबत सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात आला असता, सीबीआयने त्याला अटक केलीयं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीला रवाना केलं.

follow us