महाराष्ट्र मंत्रालयात राजेशकुमार राज्याचे नवे मुख्य सचिव; या तारखेपासून सांभाळणार पदभार

Rajesh Kumar Chief Secretary : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले होते. Maharashtra अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारी (30 जून) आपला पदभार सांभाळणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळविणाऱ्या सुजाता सौनिक या सोमवारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्याजागी ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगतिलं असून ते सोमवारी 30 जूनपासून राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळतील असं सांगण्यात आलं आहे.
Video : मोठी बातमी! पहिलीपासून हिंदीसक्ती अखेर रद्द; जनमतापुढे फडणवीस सरकार नमले
राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आल्याचे साग्न्यात येत आहे.मुंबई पर्यटन 1988 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले राजेशकुमार मीना हे ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे राजेशकुमार मीना यांच्याबाबतही असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.