क्रेडाईची बैठकीमुळे राज्यभरातील शहरांना नवा आयाम मिळणार

  • Written By: Published:
क्रेडाईची बैठकीमुळे राज्यभरातील शहरांना नवा आयाम मिळणार

CREDAI Maharashtra’s 2nd General Body Meet in Ahilyanagar: बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या (CREDAI) महाराष्ट्र राज्य शाखेची दुसरी जनरल बॉडी मिटिंग एेतिहासिक अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) पार पडली. ही बैठक आयोजित करण्याची संधी क्रेडाई अहिल्यानगरला लाभली होती. दीपप्रज्वलन आणि महाराष्ट्र गीत सादर करून उद्घाटन समारंभ झाला. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, सचिव आशिष पोखरणा, खजिनदार सुरेंद्र भोईटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

राज्यातील 60 शहरांतील तीनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स यात सहभागी झाले होते. यात बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सरकार दरबारी मांडण्यात येणारे प्रश्न, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलांची माहिती व त्याची दिशा, तसेच राज्य संघटनेच्या भविष्यातील कामकाजाचे नियोजनाबाबत चर्चा झाली.

उद्घाटनाच्या सत्रात रेन वॉटर हॉर्वेस्टिंगवर चर्चा झाली. तसेच आगामी क्रेडाई उपक्रमांची घोषणा करण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास विषयावर उमेश वानखेडे आणि सपना राठी यांनी मार्गदर्शन केले. तर मुक्त चर्चासत्रात रेरा बंद गॅलरी योजना, बांधकाम व्यावसायिकांना ‘व्हाईट कॉलर’ दर्जा, हेल्प डेस्क अ‍ॅपसंबंधी शंका व चर्चा झाली. तर दुसऱ्या सत्रात वास्तुशास्त्र आणि उच्च इमारतींवर अविनाश नवठे यांनी मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या सत्रात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लॅम्बिंग चर्चा झाली. तर चौथ्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया यांचा प्रेरणादायी संवाद झाला. या संवाद सत्राचे सूत्रसंचालन आशिष पोखरणा यांनी केले. पाचव्या सत्रात गृहनिर्मितीचे कौशल्य यावर सर्वेश जावेदकर यांनी मार्गदर्शन केले. (CREDAI Maharashtra’s 2nd General Body Meet in Ahilyanagar)

बांधकाम व्यावसायिकांना परवानग्या मिळताना अनेक अडचणी येतात. त्यातून गुंतवणूकदार व ग्राहकांना तोटा होतो, अशी खंत क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील बांधकाम व्यावसायिक अहिल्यानगरमध्ये आले होते. त्यांनी बदलते व विकसित अहिल्यानगर शहर पाहिले आहे. त्याचा नगरकरांनाही फायदा होईल, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर शहरात रिअल इस्टेटचा विस्तार होत आहे. या बैठकीमुळे अहिल्यानगर शहराचे नावही मोठे झाले आहे. यातून शहराच्या विकासाला नवा आयाम मिळेल, असा विश्वास उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

रेरा, जमीन मोजणीचा विषय, फायनान्समधील अडचणी हे प्रश्न मंत्रालयास्तरावर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे क्रेडाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिष पोखरणा यांनी सांगितले.

राज्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक एकत्र आल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास, नवीन संधी निर्माण होण्यास मदत झाल्याचे क्रेडाई अहिल्यानगरचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी म्हटलंय.

अहिल्यानगर क्रेडाईच्या नव्या संचालक मंडळाचे पदग्रहण आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षेखाली झाले. संघटनेची धुरा गिरीश अग्रवाल यांच्या नेतृत्वात नवनियुक्त संचालक मंडळावर सोपवण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अहिल्यानगरचे आयुक्त यशवंत डांगे, क्रेडाई राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. अहिल्यानगर क्रेडाईचे सचिव दीपक बांगर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी लेट्सअप, विन्टस फॉर्मवर्क, सिमेरो सिरेमिक्स, निराली एनजी, एस एस पॉलिमर्स, निर्माण असोसिएट्स, पारस पाईप्स आणि ग्रीन आर्ट्स इरिगेशन इनोवेटिव मिडिया यांचे विशेष सहकार्य लाभले.

या बैठकीमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास मदत झालीय. त्यामुळे नगरच्या बांधकाम व्यवसायाला नवीन आयाम मिळून, त्याचा शहरवासियांना फायदा होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनिर्वाचीत पदाधिकारी उपाध्यक्ष -सागर गांधी, प्रसाद आंधळे, अमित वाघमारे, विक्रम जोशी, कमलेश झंवर, मयूर कोठारी, राजेंद्र पाचे, अमित फिरोदिया, अनिल गांधी, ॲड. संदीप भापकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.त्या वेळी ॲड. जयंत भापकर, संजय गुगळे यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच युथ विंगचे अध्यक्ष धवल इंगळे, व वुमेन्स विंगचे साक्षी मुथा यांचे विशेष सहकार्य लाभले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube