Nilesh Rane : वैभव नाईक हा खोटारडा माणूस…निष्ठावान कधीपासून झाला!

Nilesh Rane : वैभव नाईक हा खोटारडा माणूस…निष्ठावान कधीपासून झाला!

मुंबई : उद्धव ठाकरे तेल लावत गेले तरी चालेल. पण मी आमदार राहिलो पाहिजे. या भूमिकेत कुडाळचे आमदार वैभव नाईक काम करतात. नाईक हा माणूस अत्यंत खोटारडा आहे. तो उद्धव ठाकरे यांच्या बरोबर खोटी निष्ठा दाखवत आहे. त्यांना फक्त आमदारकी टिकवायची आहे, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला.

निलेश राणे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. ठाकरे यांची साथ सोडणार नाही. माझी निष्ठा त्यांच्यापाशी आहे, असे वैभव नाईक हे सांगत आहेत. पण, मी सांगतो वैभव नाईक यांचा निष्ठा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. निष्ठा या शब्दाचा आणि वैभव नाईक यांचा लांब लांब पर्यंत संबंध नाही. निष्ठेचा दाखला द्यायची वेळ आली तर त्यांच्याच घरातील लोक देणार नाही. इतका नाईक हा माणूस अत्यंत खोटारडा आहे.

Chandrashekhar Bavankule : मोदींना चोर म्हणणाऱ्या गांधींना ‘ओबीसी’ माफ करणार नाही!

एवढं सगळं असूनही वैभव नाईक सातत्याने सांगतोय की मी पक्ष सोडणार नाही. मी निष्ठावान आहे, असे सांगणारे नाईक हे किती वेळा एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. कोणकोणती कामे करून घेतली. कुठे कुठे एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटायला गेले, हे सर्वांना चांगलं माहिती आहे. कोणाकोणाबद्दल काय काय बोलले आहेत, हे मला माहिती आहे./खरंतर नाईक हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, असा आरोप निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला.

मागच्या काही काळात वैभव नाईक यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याबद्दल विचारले होते. परंतु, तेव्हा नाईक म्हणाले कुडाळमधून राणे कुटुंब लढणार नाही. कुडाळमधून मलाच तिकीट देण्याची खात्री देणार असाल तर मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येतो, असे म्हटलेले. हे नाईक नाकारू शकत नाही. हे त्यांनी मला कोणत्याही मंदिरात येऊन सांगावे की मी असे काही बोललो नाही. नाईक यांनी देवाची शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान निलेश राणे यांनी त्यांना दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube