नगर शहरावर आता 185 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर, गुन्हेगारीला बसणार आळा

  • Written By: Published:
नगर शहरावर आता 185 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर, गुन्हेगारीला बसणार आळा

नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील व परिसरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीचा उपयोग या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाला आहे. पुढील आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.(185 CCTV cameras are now watching the Ahmednagar city)

नगर शहरात पोलिसांना गुन्ह्यांचा उलगडा होण्यासाठी मदत व्हावी, यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खासदार विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी 185 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यात शहरातील महत्त्वाचे 51 चौक, चांदबिबी महाल, महत्त्वाच्या वास्तूंचा समावेश आहे.

गड्या आपला गावच बरा! सुट्टीवर आलेले मुख्यमंत्री शिंदे पत्नीसह रमले शेत-शिवारात…

आगामी काळात आणखी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. ही कंट्रोल रुम व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाची पाहणी आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, निखील वारे, अंबादास पिसाळ, यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार विखे यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube