Satyajit Tambe : ‘केजी टू पीजी’ शिक्षणपद्धतीसाठी विकास आराखडा तयार होणार

Satyajit Tambe : ‘केजी टू पीजी’ शिक्षणपद्धतीसाठी विकास आराखडा तयार होणार

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळं (Nashik Graduate Constituency Election)चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवरील चर्चेसाठी एप्रिल महिन्यात तीन दिवसीय शिक्षण परिषदेचं (A three-day education conference)आयोजन केलं आहे. या परिषदेत शिक्षक, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्था(Educational institutions), शिक्षणतज्ज्ञ (Educationist)आणि सरकारचा शिक्षण विभाग (Education Department of Govt)या घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणारंय. त्यानिमित्तानं केजी टू पीजी शिक्षणासाठीचा पुढील 20 वर्षांसाठीचा कृती आराखडा (Action plan for next 20 years for KG to PG education)तयार केला जाणारंय. या शिक्षण परिषदेद्वारे राज्यातील सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न असेल असं, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय. नाशिक शहरातील पदवीधर, शिक्षक आदींशी संवाद साधला.

या निवडणुकीच्या आधीपासूनच आपला तरुणांशी, शिक्षण क्षेत्राशी, विविध शैक्षणिक संस्थांशी खूप जवळचा संबंध होता. निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक जवळून समजून घेता आलं. जगातील अव्वल शंभर विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. हे चित्र खंतावणारं आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी या क्षेत्राला एक नवी दिशा देण्यासाठी ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं.

शिक्षण क्षेत्रात सध्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, संस्थांना मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानात वाढ करणं, शिक्षणावरील खर्चात लक्षणीय वाढ करणं, पूर्ण वेळ कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची नेमणूक करणं, शालेय प्रशासनात सुधारणा, ITI ना अनुदान देणं, शिक्षकांसाठी अशैक्षणिक कामं बंद करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, असे अनेक निर्णय प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सार्वजनिक व खासगी शिक्षणसंस्था यांचे प्रतिनिधी, तसेच शिक्षणतज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी यांना एकत्र आणण्याचं काम ही तीन दिवसीय शिक्षण परिषद करेल, असंही सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube