Aditya Thackeray आज नाशिकमध्ये, ठाकरे गटाला पुन्हा एकदा सुरुंग

Aditya Thackeray आज नाशिकमध्ये, ठाकरे गटाला पुन्हा एकदा सुरुंग

नाशिक : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाला नाशिकमध्ये (Nashik)सुरुंग लागलाय. साधारण 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group)प्रवेश केल्याची माहिती मिळालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणारंय.

आजपासून (दि.6) चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह (Nashik) औरंगाबाद (Aurangabad)दौऱ्यावर येताहेत. चार दिवसांमधील दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. हे सुरु असतानाच आज ठाकरे गटातून पन्नासहून अधिक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचं दिसून येतंय.

शिवसेना ठाकरे गट डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी वेळोवेळी संवाद दौरे-मेळावे घेताना दिसताहेत. तर दुसरीकडं शिंदे गटात प्रवेश करण्याची संख्या देखील वाढताना दिसतेय. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून शिवसेनेची ओळख आहे. परंतु सत्तांतर झाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेनेत दोन वेगवेगळे गट पडले आहेत.

ठाकरे गटातून शिंदे गटात दर 15 दिवसांनी किंवा एक महिन्यानं इनकमिंग होत असल्याचं दिसतंय. त्यामुळं ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढतेय. त्यापूर्वी अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी यासारख्या दिग्गज नेत्यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतलाय. आता आदित्य ठाकरे हे नाशिकला येत आहेत. जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं समजतंय. दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणारंय. ही ठाकरे गटासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube