…तर मी रोहित पवारांचे मनापासून स्वागत करेल, ‘त्या’ वादावर राम शिंदेंची प्रतिक्रिया

Untitled Design   2023 05 27T195542.614

Ahilyadevi Holkar Birth Anniversary Yatra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रम आयोजित करण्यावरून भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात काहीशी माघार घेतली आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, की रोहित पवार यांनी इतर कार्यक्रम घेण्याऐवजी मुख्य कार्यक्रमात सहभागी झाले तर मी त्यांचे स्वागत करेल असे म्हणतच एक प्रकारे शिंदे यांनी रोहित पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमावरून रोहित पवार व राम शिंदे यांच्यामध्ये वाद पेटलेला आहे. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले, हा कार्यक्रम काही राजकीय तसेच कोणत्या पक्षाचा नाही. त्यामुळे रोहित पवार यांना माझे आवाहन आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवावी. तसेच कार्यक्रमात सहभागी व्हावे.

दरम्यान रोहित पवार यांनी 31 मे ऐवजी 30 मे रोजी रात्री महापूजा व जलाभिषेकाचे आयोजन केले आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, पूजनीय अहिल्यादेवी यांचा 31 मे रोजी जन्म झाला आहे. त्यामुळे त्याच दिवशी जयंती साजरी केली जाते. एक दिवस आधी नाही तसेच हिंदू धर्मात देखील अशी आपली प्रथा नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी असे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी मुख्य कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी करतो आहे, असे शिंदे म्हणाले आहे.

अहिल्यादेवींचे मंदिर आहे तिथे कोणाला येण्यास आमचा विरोध नाही. त्यांनी यावे दर्शन घ्यावे. तसेच तिथे होणाऱ्या जलाभिषेकाला माझा विरोधी नाही. कोणी आपल्या फॅमिलीसह आले तसेच खुद्द शरद पवार हे देखील जलाभिषेकाला आले तरी माझा विरोधी नाही अशी स्पष्ट भूमिका राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला बोलवले नाही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षी आयोजित कार्यक्रमाला रोहित पवार यांनी मला आमंत्रण दिले नव्हते. मात्र असे असले तरी या कार्यक्रमाला मी त्यांना बोलावले आहे. त्यांनी देखील सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करतो. तसेच मी सर्व आमदार, माजी आमदार यांना कार्यक्रमाला यावे असे आवाहन केले आहे.

Tags

follow us