अहिल्यानगर हादरले ! हायवेवरच पिस्तूल काढत हवेत गोळीबार, एक जण गंभीर जखमी

Ahilyanagar police-भरदिवसा झालेल्या या थरारक घटनेत दीपक शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
Jeur Midc

Ahilyanagar police : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर परिसरात जुन्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा झालेल्या या थरारक घटनेत दीपक शिंदे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तींमध्ये सुरू असलेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. त्यानंतर कोयत्याने हल्ला करत हवेत गोळीबार झाल्याचे समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे गाव आहे. महामार्गावर एका हॉटेलमध्ये दोन गटात वाद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. गोळीबारामागील नेमके कारण, तसेच हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, जुन्या वादातून पुन्हा एकदा हिंसक स्वरूपाची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

follow us