Ahmednagar : महापालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • Written By: Published:
12157_15633508595d2ed74b78dbb

अहमदनगर महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निखील गायकवाड या अभियंत्याला बोल्हेगावमधील नागापूर येथे काल (मंगळवारी) सायंकाळी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी भरत सप्रेसह दोन जणांवर सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

बोल्हेगावमधील गणेश चौक येथे नळ जोडणीवरून झालेल्या वादातून भरत सप्रेसह दोन नागरिकांनी शिवीगाळ करत महापालिका कर्मचारी गायकवाड यांना धक्काबुक्की केली. या संदर्भातील फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात आज (बुधवारी) पहाटे दाखल झाली.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

या शिवाय महापालिका कर्मचाऱ्याला दुरध्वनीवरून शिवीगाळ केल्याचीही फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. महापालिका कामगार संघटनेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बोल्हेगाव व नागापूर परिसरातील अवैध नळ जोडणी विरोधात मोहीम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tags

follow us