धक्कादायक! क्रूर पित्याने दोन मुलांना ढकलले विहिरीत; अहमदनगरमध्ये बापाच्या नात्याला काळिमा

धक्कादायक!  क्रूर पित्याने दोन मुलांना ढकलले विहिरीत; अहमदनगरमध्ये बापाच्या नात्याला काळिमा

Ahmednagar Crime : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा आणि शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हे गारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता एक बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पती-पत्नीच्या भांडणात एका क्रूर पित्याने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Ahmednagar Crime Father pushed two children in Well )

बोलताना काळजी घ्या! फडणवीसांनी धाडला संभाजी भिडेंना निरोप? माजी आमदार बनला दूत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आळसुंदे गावात रविवारी 6 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे) असं या क्रूर पित्याचं नाव आहे. तर त्याने त्याच्या 8 वर्षीय मुलगी ऋतुजा क्षीरसागर आणि 4 वर्षीय वेदांत क्षीरसागरला थेट विहिरीत ढकलून दिले. दुर्दैवाने या दोन चिमुकल्यांचा यात मृत्यू झाला आहे.

आजपासून राजस्थानचा नकाशा बदलला; अशी आहे गेहलोत सरकारची योजना

काय आहे घटना?
गोकुळ क्षीरसागर याचं आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं होतं. या रागाच्या भरात गोकुळ याने त्याच्या 8 वर्षीय मुलगी ऋतुजा क्षीरसागर आणि 4 वर्षीय वेदांत क्षीरसागरला घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत ढकलून दिले. दरम्यान गावकरी तेथे आले. त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी आले असता. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मुलांना कर्जत जिल्हा रूग्णालयात आणलं. मात्र दुर्दैवाने या दोन चिमुकल्यांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस म्हणाले की, गोकुळ क्षीरसागर याचं आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं होतं. या रागाच्या भरात गोकुळ याने त्याच्या 8 वर्षीय मुलगी ऋतुजा क्षीरसागर आणि 4 वर्षीय वेदांत क्षीरसागरला विहिरीत ढकलून दिले. हा व्यक्ती व्यसनी असून घरघुती भांडणात त्याने हा गुन्हा केला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube