धक्कादायक! मुलासह विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी पेटवलं सासरच्यांचं घर

धक्कादायक! मुलासह विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी पेटवलं सासरच्यांचं घर

Ahmednagar Crime:अहमदनगर जिल्ह्यात एका विवाहित महिलेने सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाला विहिरीत ढकलून नंतर स्वतः देखील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. तिसगाव तालुक्यात हि घटना उघडली आहे. दरम्यान या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी तिसगाव येथे येऊन तिच्या सासरच्या घराला आग लावून संताप व्यक्त केला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Crime Lady pushed son in well and committed suicided relatives set on fire in laws house )

पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व मुलगा ओमकार (वय १०)वर्षे या मायलेकराने त्यांच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीत मृतदेह असल्याचे समजताच तिसगाव ग्रामस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोघांचे मृतदेह बुधवारी दुपारनंतर विहिरीतून बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला पाठवले.

काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

दरम्यान मनीषाचे माहेर असलेल्या शेवगाव तालुक्‍यातील खुंटेफळ येथील नातेवाइक मंडळींनी तिसगावमध्ये आली. सासरच्या नरवडे कुटुंबाचे राहते घर पेटवून देत संताप व्यक्त केला. नरवडे कुटुंबाचे घर पेटल्याची माहिती समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ याघटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली व काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तत्काळ पेटलेले घर दुपारी एक वाजता सुमारास विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी गोठ्यात बांधलेल्या गायी, म्हशी, बैल शेळ्यांना सुरक्षित स्थळी हलविले. मयत मनीषा नरवडे व ओमकार नरवडे यांचा अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता नरवडे यांच्या राहत्या घरासमोर करण्यात आला. सासर व माहेरची मंडळी समोरासमोर आल्याने तिसगावमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी हजर होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

तिच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल मनिषा हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती संदिप लक्ष्मण नरवडे, सासु मिरा लक्ष्मण नरवडे, सासरा लक्ष्मण नरवडे , दिर विलास लक्ष्मण नरवडे (सर्व रा. तिसगांव ता. पाथर्डी) व नणंद संध्या माने (रा. ढवळेवाडी, ता. पाथर्डी) या पाच जणांवर पाथर्डी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube