नगरमध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खून; पत्रकारासह दोघे जेरबंद

नगरमध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खून; पत्रकारासह दोघे जेरबंद

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये खून, गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दर महिन्याला एखाद दुसरा खून नगर जिल्ह्यात घडलेला दिसतो. त्यातच आता नगर शहरात आणखी एका खुनाचा उलगडा झाला आहे. नगरमधील निवृत्त सैनिकाचा खून केल्याप्रकरणी नगरमधील एका सायंदैनिकाच्या पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. हा खून खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झाल्याची माहिती समोर आली आहे.(Ahmednagar Crime loni Murder case Two people, including a journalist, are in jail Property buying and selling)

PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नगरमधील विठ्ठल नारायण भोर (वय 48) रा.गणेश चौक बोल्हेगाव ता. नगर यांचा खून झाला होता. याप्रकरणी मनोज वासुमल मोतीयानी (वय 33) रा. सावेडीगाव अहमदनगर आणि स्वामी प्रकाश गोसावी (वय. 28) रा. सावेडीगाव, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे.

चंद्रशेखर रावांनी राजू शेट्टींना पश्चिम महाराष्ट्रातच शोधला पर्याय; थेट सांगलीत येऊन देणार ताकद

घडलेली घटना अशी की, दि. 30 जुलै रोजी लोणीमध्ये अनोळखी व्यक्तीने अंदाजे 40 ते 55 वयाच्या पुरुषाच्या छातीवर अज्ञात हत्याराने भोसकून खून केला. या घटनेबाबत लोणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानंतर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटना ठिकाणाला भेट दिली. त्या ठिकाणी माहिती घेताना पथकाला एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसून आले. त्याआधारे पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास सुरु केला.

दुसरीकडे 29 जुलैला अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात विठ्ठल नारायण भोर (वय 48), रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर यांच्या बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या मिसिंगमधील व्यक्ती आणि त्या घटनेत मृत व्यक्तीचे वर्णन मिळते जुळते असल्याचे दिसून आले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला बेपत्ता असलेले विठ्ठल भोर यांच्याबाबतची माहिती घेण्याचे सांगितले. भोर यांच्याबद्दलची माहिती घेत असताना त्यांचे मनोज मोतीयानी यांच्याबरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असून त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले असल्याबाबतची माहिती मिळाली.

त्यानंतर स्थानिक पोलिसांनी मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, अहमदनगर याचा शोध घेतला मात्र तो आपला साथीदार स्वामी गोसावी याला सोबत घेवून गेल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर तो भोपाळकडे निघाल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर सेंधवा, मध्यप्रदेशमध्ये जावून आरोपींचा शोध घेतला त्या ठिकाणी जावून पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपींना ताब्यात घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube