चंद्रशेखर रावांनी राजू शेट्टींना पश्चिम महाराष्ट्रातच शोधला पर्याय; थेट सांगलीत येऊन देणार ताकद

चंद्रशेखर रावांनी राजू शेट्टींना पश्चिम महाराष्ट्रातच शोधला पर्याय; थेट सांगलीत येऊन देणार ताकद

सांगली : भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी (1 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वीच्या महाराष्ट्र दौऱ्यांमध्ये त्यांनी विदर्भ, मराठवाडा, सोलापूरच्या या भागात उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर यावेळी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. (Telangana Chief Minister Chandrasekhar Rao will meet leader of Shetkari Sanghatana Raghunathdada Patil)

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचं उद्या हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सांगलीमधील वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या साखराळे येथील घरी दुपारी दोन वाजता केसीआर यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; कोणत्या पक्षाला धक्का देणार?

तिथून दुपारी चार वाजता ते कोल्हापूरमध्ये जातील. तिथे करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा विमानाने हैदराबादकडे रवाना होतील.

राजू शेट्टींच्या नकारानंतर विरोधातील नेत्याला गाठलं :

मागील काही दिवसांपासून चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक माजी आमदार आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र अब की बार, किसान सरकार असं म्हणतं पक्षविस्तार करु पाहणाऱ्या केसीआर यांच्याकडे एकाही बडा शेतकही नेता नव्हता.

यापूर्वी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनाही मुख्यमंत्रिपदाची आणि संपूर्ण संघटनाच भारत राष्ट्र समितीमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर केसीआर यांच्याकडून शेट्टी यांच्याच पक्षाच्या रविकांत तुपकर यांनाही संपर्क करण्यात आला. मात्र तुपकरांनीही केसीआर यांनी नकार दिला.

Mumbai Train Firing : ‘भारतात रहायचे असेल तर मोदी आणि योगी…’, हल्लेखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर आता केसीआर यांनी रघुनाथदादा पाटील यांना संपर्क केला आहे. उद्याच्या दौऱ्यामध्ये ते रघुनाथदादा पाटील यांच्या घरीही भेट देणार असून तिथे त्यांच्यासाठी खास भोजनाचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. रघुनाथदादा आता केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश करणार का? असाही सवाल विचारला जात आहे.

रघुनाथदादा पाटील कोण आहेत?

दिवंगत शरद जोशी यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे संघटन करुन त्यांची ताकद उभी केली. याच शरद जोशी यांच्या तालमीत रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी तयार झाले. मात्र, 2004 मध्ये शरद जोशी यांनी भाजपशी मिळतेजुळते घेतल्याचा दावा करत जातीयवादी शक्तीबरोबर घरोबा नको अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतरच्या काळात सदाभाऊ खोत यांची शेट्टी यांना साथ मिळाली.

तर शेतकरी आणि शेतीचे अगणित प्रश्‍न आहेत असं म्हणतं दुसऱ्या बाजूला रघुनाथदादा पाटील यांनी आपला लढा स्वतंत्रपणे सुरूच ठेवला. मात्र या निमित्ताने पाटील आणि शेट्टी यांचे विळ्या भोपळ्याचे वैर सुरु झाले ते कायमचे. यामुळे रघुनाथदादा पाटील हे राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक मानले जातात. या दोन नेत्यांनी गेली दोन दशके पश्‍चिम महाराष्ट्रात लढा उभारला असला तरी सवता सुभा कायम ठेवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube