आमदारांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड…नगरमधील धक्कादायक प्रकार उघड

Untitled Design (64)

Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के व लेटर पॅड, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुलमोहर रस्त्यावरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई केली आहे. ही कारवाई करत पोलिसांनी तेथील साहित्य ताब्यात घेतले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हारूण हबीब शेख (वय 31 रा. वरवंडी, ता. राहुरी) व दादा गोवर्धन काळे (वय 35 रा. निंबोडी, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. सावेडीतील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयाजवळीत एका गाळ्यामध्ये यांचे सक्सेस मल्टीसर्व्हिस आधार कार्ड दुरूस्तीचे केंद्र आहे. याच ठिकाणी बनावट कागदपत्र तयार केले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी पथकासह सोमवारी दुपारी आधार दुरूस्ती केंद्रावर छापा टाकला.

दादा जिथे आम्ही तिथे…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये या केंद्रात आ. तनपुरे, आ. जगताप, महानगरपालिका शाळेच्या (क्रमांक 23) मुख्याध्यापिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या नावाचे चार शिक्के आढळून आले. या केंद्रातील हारूण शेख, दादा काळे आणि वीरकर ही महिला असे तिघे कार्यरत होते. नागरिकांना आधार दुरूस्तीसाठी शासकीय पुरावा नसल्यास आमदारांच्या शिक्क्यांचा वापर करून रहिवाशी दाखला देणे, वयाच्या दाखल्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय यांच्या शिक्क्याचा वापर केला जात होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube