मैं निकला गड्डी लेके… आमदार लंकेंच्या हातात स्टेअरिंग अन् अजितदादा साथीला…

मैं निकला गड्डी लेके… आमदार लंकेंच्या हातात स्टेअरिंग अन् अजितदादा साथीला…

Nilesh Lanke: राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पवार कुटुंबीय यांच्यामधील जवळीक सर्वपरिचित आहे. राष्ट्रवादीमध्ये जरी फूट निर्माण झाली तरी आमदार लंके दोन्ही पवारांच्या जवळचेच मानले जातात. त्यातच आज लंकेंच्या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आले होते. आमदार निलेश लंके यांनी बसचे स्टेअरिंग हाती घेऊन स्वतः बस चालवली. त्यावेळी आमदार लंकेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील शेजारीच बसून प्रवास केला.

Pune : भिडेवाडा स्मारक प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला मनपा, राज्य सरकारने जिंकला

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात काही भूमिपूजनाचे तसेच माता मोहटा देवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजितदादांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. ओपन जिप्सीमधून अजित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली, तसेच यावेळी त्यांच्यावर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला.

आरोप खरेच; बिंधास्त नोटीस पाठवा! अजितदादांच्या गटातील नेत्यांना बोरवणकरांचे चॅलेंज

आमदार निलेश लंके यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील महिलांना नवरात्रीनिमित्त मोफत मोहटा देवीचे दर्शन हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पवारांनी देखील लंकेचे कौतुक केले. आपल्या भाषणानंतर अजितदादा आणि आमदार लंके यांनी देवदर्शनासाठी निघालेल्या बसेसला हिरवा कंदील दाखवला. यावेळी एका बसमध्ये खुद्द आमदार निलेश लंके हे बसले त्यांनी स्टेअरिंग हाती घेतले. त्यांच्याच बाजूला मंत्री अजित पवार हे देखील बसले. यावेळी लंके यांनी बस घेऊन जात अजितदादांनाही प्रवास घडवून आणला.

राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे… दादांचे देवीचरणी साकडे
राज्यातील काही भागात पावसाने ओढ घेतली आहे. अनेक भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यातील काही भागांवर असलेले हे संकट टळू दे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादांनी मोहटादेवीच्या चरणी साकडेही घातले.

माता मोहटादेवीचे महिलांना दर्शन घडविण्याचे काम पुण्याचे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवीचे महिलांना अखंडितपणे दर्शन घडविण्याचे काम आमदार निलेश लंके हे गेल्या सात वर्षांपासून करत आहेत. भाविकांची देवीप्रती असलेली श्रद्धा जपण्याचे आमदार लंके यांचे काम उत्तम आणि पुण्याचे आहे. लोकसेवेचा वसा घेऊन जनतेच्या विकासासाठी अहोरात्र करण्यात येणारे आमदार लंके यांचे काम हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube