Ahmednagar News : आमदार लंकेंच्या प्रयत्नांना सरकारचं बळ; पारनेरचं रुग्णालय टाकणार कात !

Ahmednagar News : आमदार लंकेंच्या प्रयत्नांना सरकारचं बळ; पारनेरचं रुग्णालय टाकणार कात !

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार आहे. 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास नुकतेच शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या सेवा प्राप्त होणार आहे. दरम्यान या रुग्णालयासाठी पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. लंकेच्या पाठपुराव्याला यश आले असून ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित होणार आहे.

माझ्या मतदारसंघातील पारनेर ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालय करण्यात आला. आताचे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास शासनाने मान्यता दिल्याने शासनाचे आभार!, अशी आभाराची पोस्ट लंके यांनी सोशल मीडियावर केली आहे.

कोर्टाने झापल्यानंतर नार्वेकरांचे सूचक बोल; म्हणाले, लवकरात लवकर निर्णय…

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पारनेर ग्रामीण रुग्णालय व टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा दर्जा वाढवण्यासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्राचही सक्षमीकरण करुन सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी माझा सदैव प्रयत्न असतो. या प्रयत्नाला अखेर यश आले असून पारनेर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे, असेही आमदार लंके यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पारनेर येथील ग्रामीण रुग्णालय अनेक अडचणींचा सामना करत होते. ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्याच्या सुविधांचा अनेकदा अभाव देखील अनुभवा लागला होता. रुग्णांचे हाल होऊ नये व सुसज्ज सुविधा नागरिकांना मिळाव्या या उद्देशाने आमदार निलेश लंके हे शासनाकडे उपजिल्हा रुग्णालय संबंधी मागणी करत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार असल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

सरकारच्या हातात दहा दिवस, आरक्षण घेणारच! सभेआधीच जरांगे पाटलांचा इशारा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube