Ahmednagar Accident : टोल नाक्याला धडकून विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

Ahmednagar Accident : टोल नाक्याला धडकून विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

Ahmednagar News : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ टोलनाक्याजवळ (Toll Booth ) विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident ) झाला आहे. दुभाजकाचा अंदाज न आल्याने ही बस जोरदार आदळली. रविवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही.

Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; सिद्धार्थने अरेंज केली आई-बाबांची पहिली फॉरेन टूर

छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया क्लासेसची शैक्षणिक सहल घेऊन चाललेली बस चालकाला टोल नाक्याच्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने जोरदार आदळली. त्यामुळे बसचे समोरचे उजव्या बाजूचे चाक तुटून पडले गाडी पलटी झाल्यामुळे बसचा दरवाजा बंद झाला यावेळी गाडीत १० ते १५ वयोगटातील ४६ मुले मुली होती. रात्रीची वेळ लहान मुले असल्याने प्रसंग अतिशय भयावह होता.

थोरातांना उमेदवारी द्या, पिता-पुत्रांच्या दहशतीचे झाकण उडवू : निरीक्षकांसमोरच कार्यकर्ते आक्रमक

यावेळी अपघात झाल्यावर मुले मोठ मोठ्यानी रडायला लागली. त्यांना बाहेर काढण्यासाठी पिंपरी निर्मळ येथील स्थानिकांनी मदत केली त्यांनी बसच्या पुढची काच तोडुन, तसेच मागील आपत्कालीन दरवाजा उघडून सर्व विद्यार्थ्याना खाली घेतले. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना नवीन बस बोलून मार्गस्थ केले.

टोलनाक्यावरील बंद असलेले लाईट व मोठमोठे खड्डे यामुळे येथे कायमच अपघात होत आहेत. त्यातुन अनेकांना आपले जिवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे या परीसरात लाईटची व्यवस्था करावी व या परीसरातील रस्त्याचीही दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube