Ahmednagar : तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Ahmednagar : नगर जिल्ह्यात शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडलेल्या निघृण हत्याकांडाने अख्खा जिल्हाच हादरून गेला आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी संशयितास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडली. प्राथमिक माहितीनुसार, जावयानेच हे हत्याकांड केल्याचे दिसत आहे. जावयाने पत्नी वर्षा सुरेश निकम, मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड आणि आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड या तिघांची धारदार शस्त्राने प्राणघातक वार करून हत्या केली. तर याच घटनेत संशयिताची सासू, मेव्हणी आणि सासरे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. या जखमींवर शिर्डीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Road Accident : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; तरुणीसह महिला जागीच ठार
कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याची प्रथमदृष्ट्या समोर येत आहे. तरीदेखील पोलिसांच्या तपासातूनच नेमके कारण काय आहे हे समोर येईल. या प्रकरणात पोलिसांनी संशयित सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सावळीविहीर गावासह शिर्डी पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.