उद्या मी आमदार राहणार की नाही सांगता येणार नाही, तनपुरे असं काय म्हणाले?
Ahmednagar : शिवसेना नेमकी कुणाची आणि 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचीच असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावर देखील आता निर्णय होणं बाकी आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी भाष्य केलं आहे. लवकरच राष्ट्रवादी पक्षाबाबत देखील निर्णय होणार आहे. उद्या काय निर्णय होणार हे काही सांगता येत नाही. येत्या काही दिवसात मी आमदार असेल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, असं वक्तव्य आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
गणपतरावांच्या नातवाकडून शहाजीबापूंना आस्मान! शिंदेंचा वाघ विधानसभेलाही ‘डेंजर झोनमध्ये’
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी (दि.10) रोजी जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी आमचीच असा दावा दोन्ही गट करत आहे. मात्र यावर लवकरच निर्णय होणार आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी कोणाची व भविष्यात काय होणार, यावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे.
TCS चा नफा वाढला पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली…कारण काय?
यावेळी तनपुरे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेला निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत देखील लवकरच निकाल येणार आहे. मात्र सध्या शिवसेनेबाबत जो काही निकाल देण्यात आला आहे, यावरून आम्ही जी काही अपेक्षा करतो आहे, त्यापेक्षा वेगळेच निकाल जाहीर होत आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीबाबतचा निकाल देखील येणार आहे. आमची बाजू रास्तपणे मजबूत आहे, सर्व प्रक्रिया आम्ही व्यवस्थितपणे पार पडल्या आहेत. मात्र येत्या काळात काय निर्णय होणार? हे काही आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी आमदार राहिल की नाही हे आज सांगता येणार नाही. मात्र जनता ही येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवेल अशी आशा देखील यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
कोणतंही चिन्ह घेऊन आम्ही लढू…
शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल नार्वेकर यांनी दिला. यामुळे आता येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका या ठाकरे गटासाठी अडचणीच्या ठरू शकतात. तर येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्र्वादीबाबत देखील निर्णय होणार आहे. उद्या कोणतंही चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढवू यामुळे चिन्ह कोणतं आहे? याचा फरक आम्हाला पडणार नाही.
राज्यातील जनतेचा विश्वास हा उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील जनता ही पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणेल, असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.