Ahmednagar : परीक्षा केंद्रावरील भरारी पथकावर दगडफेक

Ahmednagar : परीक्षा केंद्रावरील भरारी पथकावर दगडफेक

पाथर्डी : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 12 वी पेपरफुटी प्रकरण (Paperleak) ताजे असतानाच पाथर्डी (Pathardi)तालुक्यातील टाकळीमानूर येथे भरारी पथकावर आज (बुधवारी) दगडफेक झाली. टाकळीमानूर (Taklimanur)येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर (Exam Center)हा प्रकार घडला. कॉपी पुरवणाऱ्या गावातील जमावाने भरारी पथकावर दगडकेफ केली. या घटनेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे (Dr. Jagdish Palwe) व भरारी पथकातील रामेश्वर शिवणकर (Rameshwar Shivankar)यांच्यावर भिरकवलेल्या दगडफेकीत शिवणकर हे गंभीर जखमी झाले तर पालवे हे किरकोळ जखमी झाले.

जय भवानी माध्यमिक विद्यालयात आज (बुधवारी) सकाळी दहावीचा भूमिती विषयाचा पेपर सुरू होता. परीक्षा केंद्रावर 217 विद्यार्थी पेपर देत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास परीक्षार्थिंना कॉपी पुरवणाऱ्या जमावाणे परीक्षा केंद्रातील संरक्षण भिंत ओलांडत प्रवेश केला.

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

यावेळी परीक्षार्थींना कॉपी करण्यास मुभा देण्याची मागणी केल्याचे समजते. परीक्षा केंद्रामध्ये घुसलेल्या व्यक्तींना भरारी पथक प्रमुख गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर काढले. या गोष्टीचा राग येऊन जमावाने परीक्षा केंद्रावर दगडफेक केली. झालेल्या दगडफेकीत भरारी पथकातील रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले.

परीक्षा केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना या हल्ल्यातून वाचवले तर गटविकास अधिकारी जगदीश पालवे हे देखील किरकोळ जखमी झाले. शिवणकर यांना टाकळीमानूर येथे प्राथमिक उपचार करुन पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

यापूर्वी देखील कॉपी पुरवणाऱ्या हल्लेखोरांनी गणिताच्या पेपरला कॉपी विरोधी पथकातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून परीक्षार्थिंना कॉपी पुरवल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube