भिंगारकरांचा श्वास मोकळा! छावणी परिषदेची बेधडक कारवाई…

भिंगारकरांचा श्वास मोकळा! छावणी परिषदेची बेधडक कारवाई…

अहमदनगर : भिंगार शहरातील शुक्रवार बाजार परिसरात आज भिंगार छावणी परिषदेने बेधडक कारवाई केली आहे. छावणी परिषदेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवार बाजारातील छोट्या-मोठ्या टपऱ्या हटवल्या आहेत. छावणी परिषदेच्या या बेधडक कारवाईमुळे भिंगारकराचा कोंडलेला श्वास अखेर मोकळा झाला आहे.

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार बाजार परिसरासर इतर भागात टपरीधारक, हातगाड्यांनी ताबा मिळवत अतिक्रमण केलं होतं. अनेक दिवसांपासून हे अतिक्रमणधारक टपरी आणि हातगाड्यांवर आपला व्यवसाय करीत होते.

Sonu Nigam : वैभव आणि ह्रताच्या रोमॅंटीक गाण्याला सोनू निगमचा आवाज

टपरीधारकांचं हे अतिक्रमण शुक्रवार बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर होतं. शुक्रवारी भिंगारमध्ये मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजार भरतो. जिल्हाभरातून अऩेक नागरिक इथं बाजारहाटासाठी येत असतात. टपरीधारकांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना बाजारातून चालण्यासही वाट मिळत नव्हती. तसेच वाहतुकीसही मोठा अडथळा येत होता.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार

हे अतिक्रमण हटवावं, या मागणीचा सूर अनेक दिवसांपासून भिंगारकरांमध्ये सुरु होता. अखेर आज छावणी परिषदेने बेधडक कारवाई करत बाजारातील टपऱ्या, रस्त्यांवरील टपऱ्या, टपरीवरील छत, काढून भिंगारकरांचा कोंडलेला श्वास मोकळा केला आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या आदेशाने छावणी परिषदेचे विभागीय अभियंता एम. एम. सोनवणे, रमेश साके, शिशीर पाटसकर, प्रविण बागल या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube