नगरमध्ये चाललंय तरी काय? आमदार लंकेंच्या मतदारसंघात दिवसा ढवळ्या गोळीबार…
Ahmednagar : नगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order
)बोजवारा उडालेला दिसून येत आहे. खून, दिवसा ढवळ्या गोळीबार, जीवघेणा हल्ला अशा घटना घडत असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (Yuvraj Pathare)यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यामधून गोळीबार (firing)करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले आहेत मात्र या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Gautam Gambhir : दिग्गज असो की सिनियर, कुणालाच सोडलं नाही; क्रिकेट ‘हिस्ट्री’मधील गंभीरचे 5 मोठे वाद
याबाबत अधिक माहिती अशी, युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक आहे. पारनेरमध्ये हॉटेल दिग्विजय याठिकाणी तिथे काही युवक बसले होते. दरम्यान आज सकाळी पठारे आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये आले असता या युवकांपैकी एकाने उठून युवराज पठारे यांच्या दिशेनं गावठी पिस्तूल रोखलं. पिस्तुल पाहून हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली.
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
समोरील युवकाने पठारे यांच्यावर पिस्तुल रोखत त्याने गोळी झाडणार तेवढ्यात युवराज पठारेंबरोबर असलेले भरत गट यांनी पिस्तूल हिसकावून घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांची अलीकडच्या काळात विखेंशी जवळीक वाढली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला पकडले असून पोलीस निरीक्षक समीर बारवकर पुढील तपास करत आहेत.