…तर पाच वर्षांत महाराष्ट्रात वाईट परिस्थिती होईल ; अशांतता पसरविणाऱ्या घटनांवर खासदार विखे व्यथित

  • Written By: Published:
…तर पाच वर्षांत महाराष्ट्रात वाईट परिस्थिती होईल ; अशांतता पसरविणाऱ्या घटनांवर खासदार विखे व्यथित

Sujay Vikhe : राज्यातील इतर जिल्ह्यातील अशांततेचे लोण आता नगर जिल्ह्यात आले आहे.अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक शांतता भंग होणाऱ्या घटना वाढल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल होण्याचा प्रकार नगर शहरात (Ahmednagar City) घडला आहे. राहुरीतील उंबरे येथील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतराचे प्रकरण गाजत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) पाटील हे व्यथित झाले आहेत. (ban mobile phones; MP sujay Vikhe distressed over incidents spreading unrest)


Manipur violence : गेल्या 24 तासात 6 ठार, 16 जण जखमी; अनेक भागांत गोळीबार-जाळपोळ सुरूच

सुजय विखे म्हणाले, सामाजिक शांतता बिघडणे हे समाजासाठी घातक आहे. त्यासाठी मोबाइलवर बंदी आणण्यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे. कुणीही काहीही मेसेज टाकतो. कुणाच्या भावना दुखविल्या जातात. भावना दुखविणारे वेगळेच असतात. तोडफोड करणारे वेगळेच असतात. तर आरोपी हे वेगळेच असतात. हे वातावरण समाजासाठी अधिक घातक आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी आई-वडिलांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.

‘जर खराब काम केलं तर तुमच्यावर बुलडोझर चालवणार’; गडकरींचा ठेकेदारांना सज्जड दम

लव्ह जिहाद, मुली पळवून नेणे, छेडछाडीचे प्रकार, छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमान करणारे मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जात आहेत. आई-वडिलांनी संस्कार न दिल्यामुळे हे घडत आहे. वडिल दिवसभर बाहेर असतात. आई घराच्या कामकाजात व्यस्त असते. जुन्या काळात एकत्र कुटुंब होते. आता स्वतंत्र कुटुंब आहेत. त्याचा परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे मुलांसाठी आई-वडिलांनी वेळ दिला पाहिजे, असे आवाहन सुजय विखे यांनी दिली आहे.

अशीच परिस्थिती असेल तर पाच वर्षांत महाराष्ट्रात वाईट परिस्थिती होईल. विकास होत राहिल. काही गोष्टी करणे हे खासदाराचे किंवा पोलिसांचे काम नाही. आई-वडिलांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सामूहिक शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा कुणीही आपल्याला वाचवू शकत नाही, अशी भितीही खासदार विखेंनी व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube