राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात मद्य महागलं, महसूल वाढीसाठी विविध दरांमध्ये सुधारणा

Big decision of state cabinet Liquor will expensive in Maharashtra, various rates revised to increase revenue of excise department : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्यामध्ये मद्य महागणार (Liquor will expensive ) आहे. त्याचबरोबर इतरही काही निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (state cabinet) 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यांच्या किंमती दिड टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर आता हॉटेलमध्ये देखील शॉपसारखी विदेशी मद्याची विक्री करता येणार आहेत. त्यावर मात्र 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागातील 1 हजार 223 पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात मद्य महागल्याने (Liquor will expensive ) राज्याच्या तिजोरीत तब्बत 14 हजार कोटींचा महसुल वाढणार आहे.
अक्षय कुमार: भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार!
त्यानंतर आणखी दोन महत्त्वाचे निर्णय या बैठकीत (state cabinet) घेण्यात आले आहेत. त्यात सामाजिक न्याय विभागासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. या संबंधित विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही 8,000 विद्यावेतन मिळणार आहे.