‘…माझं तिखट खायलासुद्धा येणार’; शिंदे-लंकेंच्या फराळाला विखेंचं तिखट उत्तर

‘…माझं तिखट खायलासुद्धा येणार’; शिंदे-लंकेंच्या फराळाला विखेंचं तिखट उत्तर

Sujay Vikhe On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विखे विरुद्ध लंके-शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे आमदार राम शिंदेंसह निलेश लंके सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल चढवित आहेत. तर दुसरीकडे सुजय विखेंकडूनही शाब्दिक टोलेबाजी करण्यात येत आहे. अहमदनरमध्ये आयोजित एका कार्यक्रमातून सुजय विखेंनी(Sujay Vikhe) शिंदे-लंकेवर टोलेबाजी केलीयं. गोड फराळ खाल्ल, पण माझं तिखट खायलासुद्धा येणार असल्याचं तिखट प्रत्युत्तर खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके(Nilesh Lanke)-राम शिंदे(Ram Shinde) यांच्या फराळ कार्यक्रमातील भेटीवर दिलं आहे. त्यावरुन आता पुन्हा शाब्दिक चकमक होणार असल्याचं दिसून येत आहे.

Ireland Riots : आयर्लंडच्या राजधानीत जाळपोळ! लहान मुलांवरील हल्ल्यानंतर शहरात तणाव

सुजय विखे म्हणाले, नगर दक्षिणेचं एक वैशिष्ट्य आहे. राजकीय नेते फराळ सगळीकडे खायला जातात. त्याच्यात कोणाचा दोष नाही सगळीकडे दिसणार आहेत. जिल्ह्यात 15 दिवसांत 10 फराळाचे कार्यक्रम झाले. 10 दिवसांच्या फराळाला जेवढे होते, तेवढे लोकं माझं तिखट खायलासुद्धा येणार असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे.

तसेच कोणी कोणाच्या फराळाला आला म्हणजे समजायंचं नाही तो तुमचा झाला आहे. इथला इतिहास, भूगोल 50 वर्षे आमच्या परिवाराने ओळखला आहे. 10 दिवसांतल्या फराळाचं गोडं जेवण खाऊत वैगातले असाल तर उद्या तिखट जेवण माझ्याकडे असल्याचं म्हणत सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनी निमंत्रणचं दिलं आहे.

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता

…तर जिल्ह्यात प्रत्येक आमदार हवाई असता :
मागील 10 दिवसांत अनेक नेत्यांनी फराळाचे कार्यक्रम ठेवले होते. त्यामध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिक राजळे, राम शिंदे, त्यानंतर बाकी छोटे-मोठे झाले आहेत. माणूस मोठा होणार असता तर तालुक्याचा प्रत्येक आमदार एक हलवाई असता अशी टीकाही सुजय विखे यांनी विरोधकांवर केली आहे.

विपर्यास करु नका :

कार्यक्रमात बोलताना मी जे शब्द बोललेलो नाही, त्याचा विपर्यास करु नका. मी कोणावरही कोणाचं नाव घेत टीका केलेली नाही. जिल्ह्यात फराळाचा कार्यक्रम माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिक राजळे, राम शिंदे, त्यानंतर बाकी छोटे-मोठे झाले आहेत. त्यामुळे माझ्या शब्दांचा विपर्यास करु नका, अशी विनंतीच सुजय विखेंनी माध्यमांना केली आहे.

दरम्यान, मी कधीच वाढदिवस साजरा करीत नाही पण मित्र म्हणाले आता निवडणूक आलीयं तर आता तरी वाढदिवस साजरा करा. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत पुढेही राहतील. 50 वर्षाचा कौटुंबिक त्याग, वैचारिकता या नगरला आहे. आज ज्या स्थितीला नगर जिल्हा पोहोचला आहे, त्यासाठी अनेक कुटुबियांचे परिश्रम आहेत. त्यासाठी एक वारसा, विचार लागतो त्याच्या आधारावरच नगरची रचना असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube