बीआरएसच्या नेत्याकडून औरंगजेबाचं समर्थन; हिंदुत्ववादी संघटनांनी पोस्टर्सला फासले काळे

बीआरएसच्या नेत्याकडून औरंगजेबाचं समर्थन; हिंदुत्ववादी संघटनांनी पोस्टर्सला फासले काळे

BRS Poster Ribes Black : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. मात्र यामध्ये त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याचं वादग्रस्त विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ( Black on BRS Poster in Ahmnednagar City by Hindutvavadi Organization )

अजितदादांच्या मंत्र्याच्या स्वागतासाठी आश्रम शाळेतील मुलं रस्त्यावर!

भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या मौलाना अब्दुल कादरी यांनी मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलताना काही विधाने केली होती. त्यावेळी औरंगजेबाचे समर्थन केलं होत. यामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पक्षाच्या मोठमोठ्या होर्डिंग्जना अहमदनगर शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील होर्डिंग्जवर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काळे फासून निषेध करण्यात आला आहे.

Karnataka Politics : पराभवानंतर भाजपाचा टॉप गिअर; थेट केंद्रीय मंत्र्यांनाच धाडले राज्यात

या होर्डिंग वर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांचे फोटो लावलेले आहेत. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा मोठा फोटो या होर्डिंग्जवर लावण्यात आला आहे. महापुरुषांचे फोटो लावून मौलाना कादरी सारख्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्यामुळे आणि तो औरंगजेबाचे समर्थन करत असल्याने हिंदू राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील अनेक बोर्डवर या संघटनानी काळे फासले आहे. मौलाना अब्दुल कादिर याने औंरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही असा इशारा हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube