अयोध्येला जावं मात्र त्याचे राजकारण करू नये… भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला

अयोध्येला जावं मात्र त्याचे राजकारण करू नये… भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Chhagan Bhujbal Speak on CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार आहे. शिंदे हे त्यांच्या आमदार की व खासदारांसह अयोध्येला जाणार आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे मात्र मनोभावे जावे राजकारण करण्यासाठी जाऊ नये अशा शब्दात भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये आहेत. आज सकाळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना पत्रकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याबाबत विचारले यावर त्यांनी उत्तर देत शिंदे यांना सल्ला देखील दिला आहे.

भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तिभावाने अयोध्याला जावे, मात्र याचे राजकारण करु नये. राजकीय उद्देशाने त्यांनी अयोध्येला जाऊ नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून शिंदेंवर फार मोठी जबाबदारी पडली आहे. त्यामुळे राजकीय उद्देश ठेवून अयोध्या दौरा करू नये असा सल्लाही भुजबळ यांनी शिंदे यांना यावेळी बोलताना दिला आहे.

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

मंत्रिमंडळ विस्तार…नेत्यांचा अपेक्षाभंग
राज्यात शिंदे व फडणवीसांचे सरकार अस्तित्वात येऊन अनेक महिन्यांचा काळ ओलांडला आहे. काही मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र अद्यापही शिंदे गटातील काही नेत्यांना अद्याप मंत्रिपद मिळाले नाही आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला आहे. व मंत्रिमंडळ विस्तारअजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

भांडण तुम्ही लावली व ठाकरे गट तुम्ही फोडला…भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये
शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिक्रिया दिली. यावर भुजबळ यांना विचारण्यात आले असता भुजबळ म्हणाले, आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये, आपली बदनामी होता कामा नये. टाटा, बिर्ला यांनी देखील खूप मोठं मोठे काम केले आहे. टाटा कोट्यावधी रुपये दानधर्म करतात. उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचे? असे पवारांचे मत आहे. देशातील इतर महत्वाच्या मुद्द्यांना डावलून इतर मुद्द्यांवर चर्चा झाली असे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube