भांडण तुम्ही लावली व ठाकरे गट तुम्ही फोडला…भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

भांडण तुम्ही लावली व ठाकरे गट तुम्ही फोडला…भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal : भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ठाकरे गट फोडल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भांडण तुम्ही लावलीत व ठाकरे गट देखील तुम्ही फोडला. शरद पवार असे काही काम करत नाही, अशा शब्दात भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

आगामी निवडणुका पाहता राज्यातील राजकारण देखील तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी देखील एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे. नुकतेच भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणारे वक्तव्य केले होते. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. भुजबळ हे आज नाशिकमध्ये आहेत.

हिंमत दाखवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच ; राष्ट्रवादीने भाजपला ललकारले !

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, ठाकरे गट हा भाजपने फोडला. शरद पवार असे काही काम करत नाही. त्यांना अशा गोष्टींसाठी वेळ देखील नाही. आपण त्यांची डायरी बघितली तर तुम्हाला समजेल की ते या वयातही किती व्यस्त असतात. त्यांना अशा छिछोरे गोष्टींसाठी वेळ नाही अशा शब्दात भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

ऑनलाईन शिक्षण व मोबाईलने लावला मुलांना चष्मा, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

भाजप – शिवसेना एकत्र येणार का? भुजबळ म्हणाले
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच एक वक्तव्य केले, उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली तर भाजप – ठाकरे एकत्र येतील. यावर पत्रकारांनी भुजबळ यांना प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच केसरकर यांनी केलेले हे विधान एकप्रकारे आश्चर्य कारक असल्याचे देखील भुजबळ यावेळी म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube