ऑनलाईन शिक्षण व मोबाईलने लावला मुलांना चष्मा, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

Untitled Design   2023 04 08T140045.560

Children’s glasses : गेली दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवावी लागले होते. यामुळे मुलांना नाईलाजाने ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. यातच पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करून दिला आहे. कमी वयामध्ये मुले मोबाईलचा वापर करू लागले. स्मार्ट फोन, ऑयपॅडचा वापर वाढल्याने डोळ्यांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली अतिवापर यामुळे मुलांना चष्मा लावावा लागला. म्हणूनच आता सरकारने मुलांना चष्मा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील ४ हजार ४६१ शासकीय आणि अनुदानित शाळांमधील सुमारे सात लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार शाळांमधून माेफत चष्मे वाटप केले जाणार आहे, असा सार्वजनिक आराेग्य विभागाने निर्णय घेतला आहे. यात ६ ते १८ वयाेगटातील मुलांचा समावेश राहणार आहे, यासाठी सरकारकडून निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अदानींची वीज तयार होते मग, विरोधकांची एकजूट कशी खराब होईल? ; पवारांचा मिश्कील प्रश्न

कोरोना काळात मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्याची मुलांना सवय लागली. परिणामी अनेकांना डोळ्यांचे आजार जडले. आता या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शास्त्रीय पद्धतीने केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार त्यांना चष्माचे वाटप हाेणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात ८८१ अनुदानित शाळा आहे. तेथे ४ लाख ७२ हजार ९९३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा पहिली ते बारावीपर्यंतच्या आहे.

हिंमत दाखवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याच ; राष्ट्रवादीने भाजपला ललकारले !

अतिवापर टाळावा
ऑनलाइनच्या काळात मोबाईलचा वापर वाढला आहे. या इलेक्ट्रॉनिकच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मोबाइल आणि टीव्हीसाठी एक टायमिंग सेट करा यामुळे डोळ्यांचे रक्षणही होऊ शकते आणि मुलंही आनंदी राहतील.

Tags

follow us