उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप

Untitled Design   2023 04 23T142527.311

Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : भाजपा शिवसेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (ता.२३) सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लाला ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष व संयोजन समितीचे महेंद्र गंधे यांनी दिली.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार सदाशिव लोखंडे आदींसह स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे व जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेतील अंतिम कुस्ती ही बेमुदत पद्धतीने माती विभागात होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे सचिन जाधव यांनी दिली.

साडी असो वा स्कर्ट ही अभिनेत्री दिसतेच बोल्ड

स्पर्धेतील विजेत्या मल्ल्लास ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा देण्यात येणार आहे. ही सोन्याची गदा केवळ १५ दिवसात नगरमध्येच तयार करण्यात आली आहे. सेमी फायनलच्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख यांनी शैलेश शेळके याच्यावर आठ एक अशी मात करून फायनल मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनल मध्ये हर्षवर्धन सदगीर जखमी झाला होता. आज सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube