मोठी बातमी; H3N2 इन्फ्लुएंझाने वाढवली चिंता, महाराष्ट्रातील पहिला बळी अहमदनगरमध्ये

मोठी बातमी; H3N2 इन्फ्लुएंझाने वाढवली चिंता, महाराष्ट्रातील पहिला बळी अहमदनगरमध्ये

अहमदनगर : इन्फ्लुएंझाने (H3N2) राज्यातील पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला आहे. या तरुणाचा सोमवारी (ता. 13) रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला होता. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्ल्युएंझामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएंझा रुग्णाचा मृत्यू आहे.या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून हा विषाणू नगरमध्ये पोहचल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

23 वर्षीय तरुण अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. काही दिवसांपूर्वी तो पर्यटनासाठी अलिबाग येथे जाऊन आला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी तो अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथील तपासणीत कोवीड 19 सोबतच एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याला रेमडेसिवीरसोबत आवश्यक ते डोसही देण्यात आले. मात्र सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी ठरला आहे. सोमवारी (ता. १३) रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळताच अहमदनगर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

राज्यात H3N2 चं संकट वाढलं, पुण्यासह ‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक फैलाव

गेल्या काही दिवसांपासून राज्यात H3N2 चं संकट वाढतंय. शुक्रवारपर्यंत राज्यात 170 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सर्वाधीक फैलाव झाला आहे. सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासंबंधी (Corona) कोणतेही लक्षणं जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नये असे अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

या व्हायरसमुळे देशात दोन मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राच्या मोठ्या शहरात H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, पुणे आणि ठाण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube