अशोक खरातच्या संपत्तीची ईडी चौकशी होणार; सीडीआर लीक करणं अंजली दमानियांना भोवणार ? फडणवीसांचे थेट इशारा

Devendra Fadanvis-अशोक खरातच्या संदर्भात कॉल डिटेल्स (सीडीआर) लीक करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.

  • Written By: Published:
Devendra Fadnavis Ashok Kharat

Devendra Fadanvis On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात एसआयटीकडून योग्य तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्ती संदर्भात ईडी चौकशी करणार आहे. अशोक खरातच्या संदर्भात कॉल डिटेल्स (सीडीआर) लीक करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. अशोक खरातच्या गुन्ह्याबाबत फडणवीस म्हणाले, खरातविरोधात बारा गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येतेय. आता एसआयटी काय तपास करतेय रोज सांगता येणार नाही. एसआयटी योग्य वेळी माहिती सांगेल. एसआयटी उत्तम काम करत आहे. एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा, असे मला वाटते. याप्रकरणात निश्चितपणे इडी चौकशी होणार आहे. त्यासंदर्भात इडीने माहिती घेतली आहे. इडीने कारवाई सुरू केली आहे. खरातच्या जमिनीची माहिती घेतली जात आहे. माहिती व नियमानुसार जे जे करायचे ते आम्ही करू.


जुन्या गाडीचं उदाहरण की जुन्या नात्यांचा संदर्भ? दिलीप वळसे पाटील यांच्या पोस्टमागचा राजकीय अर्थ काय?


सीडीआर कोणी लीक केला ते शोधणार-फडणवीस

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातशी कोण संपर्कात होतो याचा सीडीआर असल्याचा दावा केलाय. त्यावर फडणवीस म्हणाले, अशा प्रकारच्या सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही. तो फक्त चौकशी अधिकारी यांना अधिकार आहे. त्यामुळे असा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला ? तो कोणी लीक केला. यासंबंधीत चौकशी राज्य सरकार करेल. मला वाटतं की या अशा प्रकारच्या संवेदनशील केसेसेमध्ये शेवटी आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्याविरोधात सबळ पुरावा आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिलाय.

कोण-कोणाशी बोललं, कोणी -कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरातने केलेल्या घाणेरड्या कामामध्ये कोणी सहभागी असेल तर आम्ही सोडणार नाही. यासंदर्भात सीडीआर आला कशा याची चौकशी राज्य सरकार करणार असे फडणवीस म्हणाले.

follow us