Ahmedangar : कांदा लिलाव बंद! ‘मोदीला गाडा…मोदीला गाडा’; संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी

Ahmedangar : कांदा लिलाव बंद! ‘मोदीला गाडा…मोदीला गाडा’; संतप्त शेतकऱ्यांची घोषणाबाजी

Onion auction closed for farmers : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) उठवली गेल्याने नगरच्य नेप्ती कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली. मात्र, लिलावात कांद्याला फारच कमी भाव मिळत आहे. सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल 1 हजार ते बाराशे रुपयांनी घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी गुरुवारी (दि. 9) कांदा मार्केटमधीकांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी मोदीला गाडा, मोदीला गाडा, अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

…तेव्हा निकालाआधीच आमचा भाजपला पाठिंबा होता; सुनिल तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट 

केंद्र सरकारने शनिवारी (4 मे) कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्रीला आणण्यास सुरूवात केलेली आहे. सोमवारी (दि. 6) झालेल्या लिलावात 1 लाख 37 हजार 258 पोती कांद्याची आवक झाली होती, तर 1 नंबर कांद्याला 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे गुरुवारीही (ता. 9) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता.

‘करारा जवाब मिलेगा…’; वाहनावर हल्ला, बॅनर फाडल्यावरुन रुपवतेंचा कडक इशारा 

मात्र लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव सोमवारच्या तुलनेत प्रति क्विंटल 1 हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्याचे लक्षात येताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली.

हा गोंधळ सुरू असतांना महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे कांदा मार्केटमध्ये पोहोचले. त्यावेळी लंके यांनी जिल्हा उपनिबंधकांना फोन करून कांद्याचे भाव अचानक कोसळल्याबाबत विचारणा करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

तर काही शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवेदन दिले. केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली होती, मात्र आता ती फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांच्या कांद्यासाठीच असल्याचे समोर आले आहे. हे मोदी सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. संगनमताने कांद्याचे भाव जाणीवपूर्वक कमी करणाऱ्यांवर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी कांदा उत्पादकांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज